मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालय (DRI) ने शनिवारी एक मोठी कारवाई केली. अबुधाबीहून तस्करी करून आलेल्या २.२७ किलो सोन्याची जप्ती केली. याप्रकरणी दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला ताब्यात घेत अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजार मूल्य साधारणतः पावणेतीन कोटी रुपये आहे.
डीआरआय सूत्रांच्या माहितीनुसार, एक गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष निरीक्षण ठेवले गेले होते. त्यावरून या कारवाईला प्रारंभ झाला. संबंधित प्रवाशाच्या पॅट्रनमध्ये सोनं लपवून आणलं होतं. आणि तो यशस्वीपणे तस्करी करत होता. याप्रकरणी तांत्रिक तपास सुरू असून, तस्करीचे नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी डीआरआय पुढील कारवाई करत आहे.