Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीकापसाच्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल

कापसाच्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल

अमरावती: कापसाचे उत्पादन यंदा समाधानकारक असले तरी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. भाव वाढतील या आशेवर शेतकरी आहेत; परंतु काही गरीब शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे नाइलाजास्तव कापूस विकावा लागत आहे. भाऊबीजेला बहीण आलेली असताना या पांढऱ्या सोन्याची साठवणूक कुठवर शक्य आहे, असा त्यांचा सवाल आहे. दिवाळीच्या निमित्ताने कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे. कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांचीही ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. व्यापारी शेतकऱ्यांना मनमानी भावात कापूस मागतो व शेतकऱ्याला देण्यास भाग पाडतो, असा आता शिरस्ता झाला आहे. केंद्राकडून जाहीर झालेला कापसाचा हमीभाव सात हजारांच्या वर आहे. मात्र, खासगी बाजारपेठेत कापसाचे दर नीचांकीवर आहेत.

खासगी व्यापारी कापसाला ६५०० ते ६९०० रुपये प्रतिक्विंटल भाव देत आहेत. केंद्र सरकारने २०२४-२५ साठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७१२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७५२१ रुपये हमीभाव जाहीर केला; परंतु व्यापारी त्यापेक्षा कमी दर देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. वायदे बाजारात मागील आठवड्यात ७२.३४ सेंट प्रति पाउंडवर कापसाचे दर होते. ते आता ७२.६९ सेंट प्रति पाउंडवर गेले. त्यामुळे देशातील बाजारपेठेतही कापसाचे दर वाढणार आहेत. कापसाचे पीक समाधानकारक होईल व कापसाला चांगला भाव मिळेल, अशी होती.

यासंदर्भात कापूस उत्पादक शेतकरी प्रदीप बंड यांनी सांगितले की, कापूस वेचण्याकरिता मजुरी १०-१२ रुपये प्रतिकिलो या लागली. त्यामुळे एक क्चिटल हजार ते बाराशे रुपये खर्च अत्ताच येतो. तो देण्याकरिता कापूस गावातील व्यापारालाच विकावा लागत आहे.मागच्या वर्ष ही अशीच परिस्थिति होती आणि या वर्ष ही अशीच परिस्थिति आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -