मुंबई: भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल आपल्या ग्राहकांना फायदेशीर दरात डेटा प्लान ऑफर करत आहेत. अनेकदा ग्राहकांना हे समजत नाही की कोणती कंपनी सर्वात स्वस्त आणि अधिक डेटावाला प्लान ऑफर करते. जाणून घेऊया जिओ आणि एअरटेलच्या दररोज २ जीबी डेटाच्या प्लानमध्ये कोणता फायदेशीर आहे.
जिओचा १९८ रूपयांचा प्लान
जिओचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. याची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे. यात कंपनीकडून दररोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.सोबतच यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.
जिओचा ३४९ रूपयांचा प्लान
जिओच्या या प्लानसाठी २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.सोबतच यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.
Airtel चा १९९ रूपयांचा प्लान
एअरटेलचा हा रिचार्ज प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते
Airtel चा ३७९ रूपयांचा प्लान
एअरटेलचा हा रिचार्ज प्लान एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते