मुंबई: ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’ या सिनेमांमुळे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता हेमंत ढोमे यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. नव्या वर्षी हेमंत नव्या सिनेमासह चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आगामी सिनेमाबद्दलचे सर्व अपडेट हेमंत सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. पण आता हेमंत आगामी सिनेमामुळे नाही तर, सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. हेमंत याच्या कुटुंबात नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. हेमंतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत या नव्या पाहुणीची झलक दाखवली आहे.
हेमंत याच्या कुटुंबात आलेली नवी पाहुणी दुसरी तिसरी कोणी नाही तर गाय आहे. हेमंतने गायीचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. पहिल्या फोटोत हेमंत म्हणाला, ‘आपल्या फॅमिलीची नवी मेंबर… लक्ष्मी ढोमे…’ गायीचा अन्य एक फोटो पोस्ट करत हेमंत म्हणाला, ‘देखणी लक्ष्मी…‘ हेमंत याने शेअर केलेल्या गायीचे फोटो सध्या तुफान चर्चेत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्याची पोस्ट आवडली आहे. हेमंत कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतो.