कल्याण : उध्दव बाळासाहेर ठाकरे पक्षाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी (Vijay Salvi) यांनी उपनेते पदाचा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
पक्षाकडून कल्याणमधील पदे देताना, संघटनात्मक बाबी आणि सचिन बासरे यांना उमदेवारी देताना आपणास विश्वासात घेतले नाही. या सगळ्या राजकारणामुळे व्यथित होऊन आपण राजीनामा देत आहोत, असे ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी (Vijay Salvi) यांनी पत्रात म्हटले आहे.
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विजय साळवी यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे गटातील कल्याणमधील शिवसैनिकांनी नापसंती व्यक्त केली. कल्याणमधील शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून विजय साळवी (Vijay Salvi) यांची ओळख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर ते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहिले.