चिपळूण मतदार संघातून शेखर निकम यांचा विजय निश्चित - आ. ज्ञानेश्वर म्हात्रे

रत्नागिरी: विद्यमान आमदार शेखर निकम यांनी केलेले काम पाहता त्यांचा विजय निश्चित असून फक्त आघाडी किती हे मोजायचे बाकी आहे, असे प्रतिपादन कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले.


चिपळूण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ चिपळूण दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, युती सरकारच्या माध्यमातून शिक्षकांच्या बऱ्याच समस्या सोडवण्यात आलेल्या आहेत. टप्पा अनुदान, उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांना गणवेशासाठी सुमारे ११६० कोटींचा पहिला टप्पा, लगेचच दुसरा टप्पा अशा पद्धतीने बरेचसे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे.

यापुढेही युतीचेच सरकार येणार हे निश्चित आहे. आमदार शेखर निकम यांच्या कार्याचा आढावा घेतला असता त्यांचा विजय निश्चित असून त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अनुदानित विनाअनुदानित सगळे शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी शेखर सरांच्या नक्कीच पाठीशी राहतील, असा विश्वास वाटतो, असे श्री. म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत, निवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल देसाई, तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष आकाराम संभाजी कोंडीगिरी, सावर्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक आदी उपस्थित होते.
Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड