मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडवला जात आहे. दरम्यान, विविध पक्षांच्या नेत्यांकडून बंडखोरीही केली जात आहे. काँग्रेसने रविवारी १६ बंडखोर उमेदवारांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही सूचना दिली. या सूचनेवरून पक्षाने बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. या उमेदवारांना पक्षातून ६वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
यामध्ये रामटेक मतदारसंघातील राजेंद्र मुळक, काटोल येथील काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, कसबा मतदार संघाचे कमल व्यवहार यांच्यासोबत १६ जणांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
याआधीच काँग्रेसने बंडखोरांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे भाजपकडूनी मंगळवारी ३७ विधानसभा मतदारसंघाती ४० बंडखोर नेते तसेच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली.