Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडी५१व्या सरन्यायमूर्ती खन्नांचा कार्यकाळ केवळ ६ महिन्यांचा

५१व्या सरन्यायमूर्ती खन्नांचा कार्यकाळ केवळ ६ महिन्यांचा

नवी दिल्ली: सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या सेवानिवृत्तीनंतर देशाचे ५१ वे सरन्यायमूर्ती न्या. संजीव शर्मा यांचा कार्यकाळ अवघा ६ महिन्यांचा असणार आहे. आगामी १३ मे २०२५ रोजी ते सरन्यायमूर्ती पदावरून सेवानिवृत्त होतील.
संजीव खन्ना यांचा वकिलीचा वारसा त्यांचे वडील देवराज खन्ना यांच्याकडून मिळाला. देवराज खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले आहेत. तर संजीव खन्ना यांचे काका हंसराज खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायमूर्ती होते. निवृत्त सरन्यायमूर्ती चंद्रचूड यांचा कार्यकाळ २ वर्षांचा होता. नवे सरन्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ ६ महिने असेल.

आगामी १३ मे २०२५ रोजी ते सरन्यायमूर्ती पदावरुन निवृत्त होतील. संजीव खन्ना यांनी १९८३ मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. पुढे न्यायमूर्ती खन्ना यांनी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयातून वकिलीला सुरूवात केली. त्यानंतर ते आयकर विभाग आणि दिल्ली सरकारच्या नागरी प्रकरणांचे वकीलही होते. संजीव खन्ना २००५ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. तब्बल १३ वर्षे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिल्यानंतर खन्ना यांना २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. त्यांच्या या नियुक्तीला त्‍यावेळी विरोधही झाला होता.सर्वोच्च न्यायालयातील ६ वर्षांच्या कारकिर्दीत न्यायमूर्ती खन्ना यांनी ४०० पेक्षा अधिक न्यायपीठांचा भाग म्हणून काम केले. या वर्षी जुलैमध्ये न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने दिल्लीचे तत्कालिन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचे समर्थनही त्यांनी केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -