Saturday, November 1, 2025
Happy Diwali

उबाठा गटाचे भिवंडीचे संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

उबाठा गटाचे भिवंडीचे संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ठाणे: उबाठा गटाचे भिवंडीचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उबाठा गटाने उमेदवारी नाकारल्याने रुपेश म्हात्रे नाराज झाले होते. याबाबतची त्यांची नाराजी त्यांनी जाहिरपणे बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत, हाती भगवा झेंडा घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

Comments
Add Comment