मुंबई: अजय देवगणचा सिनेमा सिंघम अगेन थिएटर्समध्ये रिलीज होऊन दहावा दिवस झाला आहे सिनेमाने येताच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, वीकडेज सुरू होताच सिनेमाच्या कमाईत घसरण झाली. मात्र दुसऱ्या वीकेंडमध्ये ही कमाई पुन्हा वाढली.
सिनेमाच्या कमाईचे १० दिवसांचे आकडे आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सिंघम अगेनने १०व्या दिवसापर्यंत एकूण कमाई २०४.२७ कोटी रूपयांची केली आहे.
सिंघमन अगेनने केला अजय देवगणचा रेकॉर्ड मजबूत
सिंघम अगेन अजय देवगणचा चौथा असा सिनेमा बनला आहे ज्याने २०० कोटींचा आकडा पार केला आहे. याआधी गोलमाल अगेन, तानाजी-द अनसंग वॉरियर आोणि दृश्यम २ ने आकडा २०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली होती.
सिंघम अगेन कॉप युनिव्हर्सचा पाचवा सिनेमा आहे. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. खास बाब म्हणजे सिनेमात सलमान खानचा दमदार कॅमिओ पाहायला मिळत आहे. याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. सिंघम अगेन सलमान खान चुलबुल पांडेच्या भूमिकेत पाहायला मिळाला.