मुंबई: सावत्र पित्याने लैंगिक अत्याचार आणि छळ करुन दोन वर्षाच्या बालिकेची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना पूर्व उपनगरातील कामगार वस्तीत उघड झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
पीडित बालिकेची आई घरकाम करते. तिने पहिल्या पतीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आरोपीसह नव्याने संसार थाटला . आरोपी हा रिक्षाचालक असून त्यांच्यासोबत राहणारी सावत्र मुलगी खटकू लागली होती. वैवाहिक आयुष्यात अडथळा ठरत असल्याने तो तिचा द्वेष करू लागला. शुक्रवारी पीडित मुलीची आई कामावरून घरी आली तेव्हा ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला त्वरित जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार दरम्यान पीडित मुलीला मृत घोषित करण्यात आले.पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.