काव्यकोडी

  101

घराची खिडकी


आमच्या घराची
खिडकी मोठी
खिडकीतून पाहायला
साऱ्यांची दाटी

खिडकीतून दिसे
आभाळ मोठे
सूर्य आणि चंद्र
खिडकीतून भेटे

पाऊस बरसून
खिडकीवर येई
सारखा भिजायला
बोलवत राही...

खिडकीतून येई
घरात वारा
पाहा वाहतो
कसा भरारा...

डेरेदार झाड एक
खिडकीतून दिसे
आमच्याकडे पाहून
रोजच हसे...

कितीतरी पक्षी
खिडकीवर येतात
चोचीतले गाणे
गाऊन जातात...

म्हणूनच घराला
खिडकी असावी
खिडकीतून अख्खी
दुनिया दिसावी.

एकनाथ आव्हाड


१) उंच पर्वत
हिरवी पाने
ओल्या मातीत
मधुर गाणे

नामाबद्दलची ही
विशेष माहिती
सांगणाऱ्या शब्दाला
काय बरं म्हणती?

२) कोल्हा काकडीला
असतो सदा राजी
कामापुरता मामा
ताकापुरती आजी

या तर आहेत
अनुभवांच्या खाणी
यांना काय म्हणतात
सांगा बरं कुणी?

३) कफ आणि खोकल्यावर
फारच गुणकारी
विंचू दंशावरही
उपयोग हिचा भारी

औषधीगुण हिच्या
अंगी ठायी ठायी
संस्कृतमध्ये ‘वसाका’ नावाने
कोण ओळखले जाई?
Comments
Add Comment

गोष्ट एका उंदराची!

कथा : रमेश तांबे एक होता उंदीर. तो एका घरात राहायचा. घरभर फिरायचा. मि

सूर्य चालताना का दिसतो?

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यची त्याच्यासारख्याच एका हुशार पण गरीब मुलासोबत आता चांगली ओळख झाली होती. तो मुलगा

इलो मिरग

वैष्णवी भोगले खरंच कोकणातल्या मिरगाच्या पावसाची एक वेगळीच मज्जा असते. कोकण तसं वर्षभर सुंदर दिसलं तरी अधिक

सिडनीमध्ये मुंबईचा वडा-पाव

अजित राऊत आम्ही ऑस्ट्रेलियात अनेक प्रेक्षणीय ठिकाणी फिरलो. त्यातील प्रमुख म्हणजे सुप्रसिद्ध ऑपेरा हाऊस, तसेच

काव्यकोडी

एकनाथ आव्हाड गुरुजी गुरुजी आमचे रोजच फळ्यावर लिहायचे सुविचार म्हणायचे सुविचारासारखा

मेरी बात और हैं...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे साहिर म्हणजे तरल शायरीचा हॉलमार्क! हळव्या, उत्कट भावना तळहातावर घेऊन तुमच्या