मुंबई: भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. गकेबहरामध्ये होत असलेल्या या सामन्यात टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची स्थिती खूप खराब झाली आहे.
हार्दिक पांड्याने ४५ बॉलमध्ये नाबाद ३९ धावा करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारतीय संघाला २० षटकांत ६ विकेट गमावत १२४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जानसे, एंडिले सिमेलाने, गेराल्ड कोएट्जी, नकाबा पीटर आणि एडन मार्करम यांनी प्रत्येकी एक विकेट गमावली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा जबरदस्त रेकॉर्ड
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिला सामना ६१ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय टी-२० मालिकेत भारतीय संघाचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. गेल्या ५ मालिकेत भारतीय संघाचा रेकॉर्ड जबरदस्त आहे.