मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी गकेबेहराच्या सेंट जॉर्ज पार्क स्टेडियममध्ये आज दुसरा सामना खेळत आहे. टी-२० मालिकेतील हा दुसरा सामना आहे. यासाठी टीम इंडिया तेथे पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेतील मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव सहन करावा लागला होता. आता दुसरा सामना त्यांच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. सामन्यादरम्यान आकाशात हलके ढग असू शकतात. मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. हवामानही थंड राहील. हवामान विभागाच्या माहितीनुसार सामान्य तापमान १६ ते २० डिग्री सेल्सियस राहू शकते. दरम्यान, सामन्यावर त्याचा परिणाम होणार नाही.
प्लेईंग इलेव्हनमध्ये होणार बदल?
भारताने आधीच पहिला टी-२० सामना दमदार जिंकला आहे. त्यामुळे दसऱ्या टी-२०मध्ये बदलाची शक्यता फार कमी आहे. सलामीवीर अभिषेक वर्माला पहिल्या सामन्यात काही खास करता आले नाही. दरम्यान संजू सॅमसनसह त्याला सलामीसाठी संधी मिळू शकते. सॅमसनने शतक ठोकले होते.
मैदानाचा रेकॉर्ड
सेंट जॉर्जियाच्या पिचबाबत बोलायचे झाल्यास येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. येथे बाऊन्सही मिळू शकतो. येथे आतापर्यंत ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झालेत. या दरम्यान पहिल्यांदा बॅटिग करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकलेत. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकलेत.