मुंबई: थंडीत आंघोळीसाठी योग्य तापमान 90° F आणि 105° F (32° C – 40° C) या दरम्यान असले पाहिजे. खरंतर शरीराचे तापमान यापेक्षा जास्त असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही हाताने पाणी किती गरम आहे हे तपासू शकता. थंडीत आंघोळीसाठी काही खास टिप्स देण्यात आल्या आहेत. थंडीत त्वचेला मुलायम ठेवले पाहिजे. कोरड्या टॉवेलने त्वचा रगडू नका.
तुम्ही आंघोळीसाठी कोमट पाणी अथवा थोडे गरम पाणी असले पाहिजे. मात्र उकळलेले पाणी असता कामा नये. आंघोळ करताना आपली त्वचा जोरात रगडू नका. तसेच आंघोळीनंतर ही त्वचा जोरात घासू नका. यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. तसेच त्वचा कोरडीही होऊ शकते.
गरम पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे असतात. यात चांगली झोप मिळते. तसेच रक्तदाब कमी होतो. तसेच तणावापासून सुटका मिळते. जर तुम्ही शारिरीकरित्या अॅक्टिव्ह असाल तर तुमच्या मांसपेशींना आराम मिळतो. कोमट पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले असते.
दरम्यान, काहीजणांची याला असहमती असू शकते. मर्यादेपेक्षा पाणी अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्रास होऊ शकतात. आंघोळ करताना जर खूप घाम येत असेल तर समजून जा की पाणी खूप गरम आहे. यामुळे त्यात थंड पाणी मिसळला. गरम पाण्याने आंघोळ केल्यास आराम तर खूप मिळतो. मात्र मर्यादेपेक्षा अधिक गरम पाणी आरोग्यासाठी घातक आहे.