ओटावा: कॅनडा सरकार स्थलांतरितांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्णय घेताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा कॅनडा सरकारच्या निर्णयाने भारतासह इतरही देशांतील विद्यार्थ्यांना चिंतेते टाकले आहे. कॅनडाने त्यांचा लोकप्रिय स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम (SDS) कार्यक्रम तात्काळ बंद केला आहे. या निर्णयामुळे हजारो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना व्हिसा प्रक्रिया सुरक्षित आणि सुलभ करण्यात मदत होणारी फास्ट ट्रॅक व्हिसा प्रक्रिया बंद झाली आहे. कॅनडा सरकारच्या या निर्णयामुळे भारतासह इतर देशांतील विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा (आयआरसीसी) च्या सूचनेत असे नमूद करण्यात आले आहे की, कॅनडाचे उद्दिष्ट कार्यक्रमाची अखंडता मजबूत करणे, विद्यार्थ्यांच्या असुरक्षा दूर करणे आणि सर्व विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेत समान आणि न्याय्य प्रवेश देणे आहे. सर्व स्टडी परमिट अर्ज आता मानक अर्ज प्रक्रियेचा वापर करून सबमिट केले जातील.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…