Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीभारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा

भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा

नवी दिल्ली: “इतर कुठल्याही देशापेक्षा भारताची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून, जागतिक महासत्तांच्या यादीमध्ये समावेश करण्यास भारत पात्र आहे”, असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले. सोची येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, “रशिया भारताशी सर्व बाजूंनी संबंध दृढ करीत आहे आणि दोन्ही देशांमध्ये कमालीचा विश्वास आहे. जगात भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यात दर वर्षी एक कोटींनी वाढ होत आहे. अब्जाहून अधिक लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, प्राचीन संस्कृती आणि आश्वासक भविष्य पाहता महासत्तांच्या यादीत भारताचा समावेश निःसंशय व्हायला हवा”.

पुतिन म्हणाले की, “भारत हा गेल्या अनेक दशकांपासून आमचा मित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधला भागीदार राहिला आहे. तब्बल दीड अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशाचा विकास दरही वेगवान आहे. त्यांच्याकडे प्राचीन संस्कृती आहे. त्याचबरोबर विकासाची मोठी क्षमता देखील आहे”. “भारत एक महान देश आहे. या महान देशाशी आपले अनेक दशकांपासून उत्तम संबंध आहेत. मॉस्को व नवी दिल्ली विविध क्षेत्रांमध्ये भागीदार आहेत आणि ही भागीदारी दिवसेंदिवस वाढवत आहोत. भारताचा जीडीपी ७.४ टक्क्यांनी वाढतोय. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचे सहकार्य वाढत आहे. भारताच्या स्वातंत्र्यालढ्यापासून उभय देशांमध्ये गुणवत्ता, विश्वास व सहकार्यामुळे अद्वितीय संबंध निर्माण झाले. या दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार हा तब्बल ६० अब्ज डॉलर्सचा आहे”.

दोन आठवड्यांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. रशियातील कझान शहरात पार पडलेल्या १६ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते. त्यावेळी व्लादिमीर पुतिन यांनी रशिया आणि भारत या दोन्ही देशातील घनिष्ठ संबंधांबाबत भाष्य केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -