मुंबई: मुंबईतील बाबा सिद्द्की हत्या प्रकरणात शूटर शिवकुमारला रविवारी एसटीएफ उत्तर प्रदेश आणि मुंबई क्राइम ब्राँचने संयुक्त कारवाई करत उत्तर प्रदेशातील बहारिच येथून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार हा आरोप बहारिच बॉर्डर येथून नेपाळला पळण्याच्या तयारीत होता.
शिवकुमारला शरण देण्यासाठी आणि नेपाळला पळून जाण्यासाठी मदत करण्याच्या आरोपात अनुराग कश्यप, ज्ञान प्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव, अखिलेंद्र प्रताप सिंह यांना अटक करण्यात आली. हे सर्व गंडारा गावात राहणारे आहेत आणि सर्व मित्र आहेत.
पुण्यातून पकडले गेले होते २ आरोपी
मुंबई क्राइम ब्राँचने एनसीपीचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात ६ नोव्हेंबरच्या रात्री पुण्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींकडे मुंबईत चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीत हे ही समोर आले आहे की आरोपींना आपल्या टार्गेटची संपूर्ण माहिती होोती. त्यांच्या ४० राऊंड गोळ्या आणि इतर हत्यारे ताब्यात घेण्यात आली. फरार आरोपी शुभम लोणकरने या दोघांना हत्येसाठी हत्यारे दिली होती.
काय आहे प्रकरण
एनसीपी नेता बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला मुंबईच्या वांद्रे येथील त्यांचा मुलगा जीशानच्या कार्यालयाबाहेर गोळी मारून हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे.