
भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद १२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर आफ्रिकेला विजयासाठी १२५ धावा हव्या होत्या. अखेरीस शेवट्च्या फळीतील फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत आफ्रिकेला हा विजय मिळवून दिला आणि बरोबरी गाठून दिली.
चार सामन्यांच्या मालिकेत आता भारत आणि दक्षिण आफ्रिका १-१ अशा बरोबरीत पोहोचले आहेत. आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टर्ब्सने सर्वाधिक नाबाद ४७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.