मुंबई : प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतो. अशातच नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली असणारा शनी ग्रह देखील परिवर्तन करणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २०२५ मध्ये शनी मिन राशीत येणार आहे. याचा फायदा इतर राशींना देखील होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फारच लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनी या राशीच्या सप्तम आणि अष्टम चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांची आधीपासून सुरु असलेली साडेसाती संपेल. या काळात अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. तुमच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते. तसेच, जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकतो.
मकर रास (Capricorn Horoscope)
या राशीतील लोकांना चांगला धनलाभ होऊन छोट्या-मोठ्या यात्रेला देखील जाण्याची शक्यता आहे. तुमची धार्मिक कार्यात आवड वाढेल. विद्यार्थ्यांना देखील अभ्यासात चांगलं यश मिळेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.
(टीप : वरील माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारे दिली आहे. ‘प्रहार’ अशा गोष्टींची पुष्टी करत नाही)