२१ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
पाकिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर आज भीषण बॉम्बस्फोट झाला. यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला असून ३०हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावरील बुकिंग कार्यालायत बॉम्बस्फोट झाला. यावेळी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जाफर एक्स्प्रेस पेशावरसाठी रवाना होणार होती. त्यामुळे घटनास्थळी प्रवाशांची मोठी गर्दी होती. क्वेटामध्ये एकामागोमाग दोन स्फोट झाले. पहिल्या स्फोटामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला असून दुसऱ्या स्फोटामध्ये १५ ते १६ जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले झाले आहेत.
दरम्यान, या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. घटनास्थळावर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.