Monday, December 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसंविधानाच्या नावाखाली काँग्रेसकडून दिशाभूल - मोदी

संविधानाच्या नावाखाली काँग्रेसकडून दिशाभूल – मोदी

डॉ. अभयकुमार दांडगे

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही . काँग्रेस संविधानाच्या नावाखाली दिशाभूल करत असून त्यांचा हा डाव महाराष्ट्रातील जनतेने उधळून लावावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड येथील प्रचार सभेत केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज असून त्यासाठी निवडणुकीतून तुमची साथ आवश्यक आहे. विधानसभा व नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केले.

महायुती सरकारने राज्यात अनेक विकासकामे केली आहेत. लाडक्या बहिणीसह जनहितार्थ अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत. मराठवाड्यात विशेष लक्ष पुरवित शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान, त्याचवरोवर पिकविमा यासारखे अनेक हितकारी निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. मराठवाड्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. काँग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात मराठवाड्याचा कोणताही विकास केला नाही. देशात काँग्रेसची सत्ता असताना ६० वर्षात जे झाले नाही ते आम्ही १० वर्षामध्ये करुन दाखविले. मराठवाड्यामध्ये दुष्काळाच्या परिस्थितीत केंद्र सरकारने व राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांसह सर्वांनाही मदत केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार निश्चितच येणार यात शंका नाही. भाजपा महायुतीच्या उमेदवारांना साथ देवून निवडणुकीमध्ये विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र सरकारने गोदावरी जलजीवन योजनेसह मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी भरीव मदत केली आहे. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या मदतीने मराठवाड्यामध्ये सोयाबीनच्या अनुदानासह शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यात आले आहे. समृद्धी महामार्ग त्याचवरोवर शक्तीपिठ महामार्ग मराठवाड्यातून जात आहे. त्यामुळे नांदेडसह नांदेड- दिल्ली, नांदेड-मुंबई मार्ग सुकर होणार आहे. लवकरच नांदेड ते दिल्ली व अमृतसर विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. महायुती सरकारने मराठवाड्यामध्ये विविध योजनांद्वारे महिलांना लखपती बनविले आहे. महिला सक्षम बनविण्यासाठी महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लोकसभा निवडणुकीत सविधानाच्या नावावर दिशाभूल करून काँग्रेसने मते मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र संविधान बदलण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट म्हंटले आहे.

लाडकी बहिण योजनेमुळे विरोधक हादरले – मुख्यमंत्री शिंदे

लाडकी बहिण योजनेमुळे विरोधक हादरले आहेत. विरोधकांच्यावतीने ही योजना फोल असल्याचा दावा करण्यात येत आहे. काँग्रेसला महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्यातून हद्दपार करुन महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी साथ द्यावी. राज्यातील विकासकामे मराठवाड्यासह करण्यासाठी पुन्हा जनतेनी साथ ह्यावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी यावेळी केले. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, खा.अशोकराव चव्हाण, खा. अजित गोपछडे, आ. हेमंत पाटील, माजी खा. प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते.

काश्मिरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. त्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आल्यामुळे पुन्हा ३७० कलम लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ओबीसी समाजामध्ये आपआपसात भांडण लावून एकमेकांविरुद्ध लढविण्याचे कारस्थान काँग्रेसकडून होत आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन मतांची विभागणी करुन डाव साधण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. तो हाणून पाडावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसने देशात अनेक घोटाळे केले आहेत. ते झाकून ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा सत्तेत यावे, असे वाटत आहे. मात्र मतदार भाजपा महायुतीसोबत खंबीरपणे उभे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -