'महाराष्ट्राची हास्यजत्रा'पुन्हा येतेय खळखळून हसवायला!

मुंबई: सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ह्या शोने ब्रेक घेतला होता. त्यामुळे प्रेक्षक हा शो पुन्हा कधी सुरू होईल याची आतुरतेने वाट पाहत होते. याच संदर्भात सोनी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यामुळे प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले. शिवाय या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री प्राजक्ता माळी सांभाळत आहे. मागील काही पर्व प्राजक्ता या टीमचा अविभाज्य भाग झालेली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर प्राजक्ताने हास्यजत्रेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने हास्यरसिकांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'We Are Back!' असं म्हणत व्हिडीओमधून तिने नव्या सीझनच्या शुटिंगला सुरूवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

या व्हिडीओमध्ये हास्यजत्रेतील कलाकार तसेच शोमध्ये असणारे प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर दिसत आहेत. येत्या २ डिसेंबरपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असं म्हणत तिने हा व्हिडीओ शूट केल्याचा पाहायला मिळतोय. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आठवड्यातील तीन दिवस प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं सगळ्यांना सांगताना दिसत आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक खुश झाले असून सर्वजण या नव्या सिझनसाठी आतुर आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ - कॉमेडीची हॅटट्रिक!” २ डिसेंबरपासून या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

Comments
Add Comment

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Sonu Nigam : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीवरून गायक सोनू निगमची सणसणीत ट्विटर पोस्ट, म्हणाला...

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादात आता गायक सोनू निगमने (Sonu Nigam) भूमिका

Kon Honaar Crorepati : माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर; सूत्रसंचालक म्हणून स्वीकारलेल्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाली...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता एका नव्या आणि अनोख्या

Salman Khan : रोमँटिक हिरो ते ‘भाई’! सलमान खानच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास

एक अभिनेता ज्याने जवळपास चार दशकं बॉलिवूड गाजवलं, अनेक चढ-उतार अनुभवले आणि तरीही त्याचं नाव ऐकताच थिएटरमध्ये

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे