Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीRam Narayan Passes Away : प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण यांचे निधन

Ram Narayan Passes Away : प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण यांचे निधन

भारतीय संगीतकार प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण यांनी ९६व्य वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण यांचं निधन झालं आहे. सारंगी वादक राम नारायण यांनी भारतीय संगिताला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवणारे ते पहिले भारतीय संगीतकार होते. पंडित या नावाने सारंगी वादक राम नारायण यांना ओळखलं जायचं. राम नारायण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रासह बॉलिवूड इंडस्ट्रीवरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण यांचं निधन

२५ डिसेंबर १९२७ रोजी राम नारायण (Legendary Sarangi Maestro Ram Narayan Passed Away) यांचा जन्म उत्तर-पश्चिम भारतातील उदयपूरजवळील आमेर गावात झाला. त्यांचे आजोबा हरलालजी बियावत आणि वडील नथुजी बियावत शेतकरी आणि गायक होते. नथुजी बियावत दिलरुबा वादक (Dilruba Instrument) होते आणि नारायण यांची आई संगीतप्रेमी होती. त्यांचे आजोबा बगाजी बियावत हे आमेरचे गायक होते. राम नारायण आणि त्यांचे आजोबा सगड दानजी बियावत उदयपूरच्या महाराणाच्या दरबारात गायचे.

पद्मविभूषणने सन्मानित

१९५६ मध्ये संगीतकार राम नारायण सोलो कॉन्सर्ट करणारे पहिले कलाकार बनले. त्यानंतर त्यांनी भारतातील अनेक प्रमुख संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले. त्यांनी अनेक अल्बम रेकॉर्ड केले. शंकरसोबत १९५० च्या दशकात दौरा केला. १९६४ मध्ये त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय मोठा भाऊ तबला वादक चतुर लाल यांच्यासोबत अमेरिका आणि युरोपचा दौरा केला. त्यांनी अनेक भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना सारंगी वादन शिकवलं. २००० च्या दशकात त्यांनी परदेशात अनेक कॉन्सर्ट केले. २००५ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -