Friday, December 13, 2024
Homeक्रीडाहेड कोच पदावरून गंभीरची बीसीसीआय करणार हकालपट्टी?

हेड कोच पदावरून गंभीरची बीसीसीआय करणार हकालपट्टी?

तब्बल ६ तास बैठक, ‘या’ २ निर्णयांवर बोर्ड नाराज

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला जुलै २०२४ मध्ये गौतम गंभीरच्या रुपात नवा प्रशिक्षक मिळाला होता. २०२४ टी२० वर्ल्ड कप राहुल द्रविड आणि त्याच्या कोचिंग टीमच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने जिंकला. पण या स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे या स्पर्धेनंतर बीसीसीआयने गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. त्याच्यासह कोचिंग टीममध्ये मॉर्ने मॉर्केल, अभिषेक नायर, रायन डोईशेट यांचीही नियुक्ती केली. तसेच क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून टी दिलीप यांना कायम केले. मात्र नव्या कोचिंग टीमच्या मार्गदर्शनाखाली भारताची कामगिरी संमिश्र राहिली.

पहिल्या चार महिन्यातच भारताला श्रीलंकेविरुद्ध वनडेत व्हाईटवॉश स्विकारावा लागला, तर कसोटीत मायदेशात पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध मालिका ०-३ अशा फरकाने गमावण्याची नामुष्की ओढावली. याशिवाय टी२० संघही बऱ्याच प्रमाणात बदलण्यात आला. त्यातही न्यूझीलंडविरुद्ध झालेला कसोटी मालिकेतील पराभव भारतासाठी मोठ्याप्रमाणात तोट्याचा ठरला. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. या मालिकेत भारताने विजय मिळवला असता, तर भारताने सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची भक्कम दावेदारी ठोकली असती. मात्र, भारताला या मालिकेतील तिन्ही सामने पराभूत व्हावे लागल्याने आता पुढील मार्ग कठीण झाला आहे.

भारताला आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील किमान ४ सामने जिंकणे गरजेचे असणार आहे. हे भारतासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे आता गंभीर आणि त्याच्या कोचिंग टीमची तसेच भारतीय संघाची अग्निपरिक्षा असणार आहे. याचबरोबर जर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारताची कामगिरी चांगली झाली नाही, तर गंभीरला कसोटीतील आपले मुख्य प्रशिक्षकपदही गमवावे लागण्याची शक्यता आहे. खरंतर बीसीसीआयने गंभीरला तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारासाठी डिसेंबर २०२७ पर्यंत भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. परंतु, आता त्याला कसोटीतील हे पद सोडावे लागू शकते. लक्ष्मण सध्या बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे. त्यामुळे त्याचा भारतीय खेळाडूंशी संवाद होत असतो. याशिवाय नियमित मुख्य प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत त्याने काही मालिकांमध्ये भारताचा प्रशिक्षक म्हणूनही भूमिका पार पाडली आहे. सध्या देखील लक्ष्मण भारतीय संघासोबत गंभीरच्या अनुपस्थितीत प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेला आहे.

बीसीसीआयकडून गंभीरची कानटोचणी

शुक्रवारी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. ज्यामध्ये बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह हे देखील उपस्थित होते. यावेळी गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना ताकीदही देण्यात आल्याचे समजत आहे. साधारण ६ तास ही बैठक झाली, ज्यात भारतीय संघाच्या निर्णयांबद्दल, तसेच न्यूझीलंडविरुद्ध फिरकी गोलंदाजीला साजेशा खेळपट्ट्या निवडण्याबद्दल आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराहला शेवटच्या सामन्यात विश्रांती देण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -