Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Amit Shah : शरद पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील १०१ साखर कारखाने मृत्युपंथाला!

Amit Shah : शरद पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील १०१ साखर कारखाने मृत्युपंथाला!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा घणाघात


सांगली : सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ काल सांगली येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचारामुळे राज्यातील २०० सहकारी साखर कारखान्यांपैकी १०१ साखर कारखाने मृत्युपंथाला लागले' अशी टीका अमित शहा यांनी केली.


सांगलीमध्ये आशिया खंडातील सर्वांत मोठा 'वसंतदादा सहकारी साखर कारखाना' उभारला होता. मात्र शरद पवार यांच्या कारकिर्दीत कारखाना विकण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सहकारातील संस्था कोणी आणि कशासाठी मोडल्या, याचे उत्तर पवार यांनी द्यावे, असे अमित शहा यांनी म्हटले


त्याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र सहकारी साखर कारखान्याच्या साखरेवरील प्राप्तिकर हटवून शेतकऱ्यांना १५ हजार कोटींचा फायदा दिला आहे. तर एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण कोणत्याही स्थितीत हटवले जाणार नाही, असे सांगत त्यांनी सांगलीला लवकरच विमानतळ होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.



देशाची अर्थव्यवस्था २०२७ मध्ये ती तिसऱ्या स्थानी येणार


केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत राज्याला १० लाख १५ हजार ९०० कोटी रुपये देण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून पाचव्या स्थानी आली असून, २०२७ मध्ये ती तिसऱ्या स्थानी येईल.



राहुल गांधींनी संविधानाचा अपमान केला


मोदी सरकारच्या काळात दहशतीवादी हल्ले कमी झाले असून, देशाच्या सीमा सुरक्षित हाती आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लाल कव्हरमध्ये संविधानाचे वाटप केले. मात्र, यामध्ये आत कोरी पानेच आहेत. यामुळे संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान त्यांनी केला आहे. कोणीही संविधान बदल करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी या वेळी दिला.

Comments
Add Comment