विरार : नालासोपारा आणि विरारमध्ये एटीएम व्हॅन मध्येच वेगवेगळ्या दोन ठिकाणी काल ६ कोटी रक्कम सापडली होती. आज पुन्हा विरारमध्ये एटीएम व्हॅनमध्ये २ कोटीची रक्कम सापडल्याने वसई विरारमध्ये खळबळ माजली आहे.
बॅंकेच्या एटीएम व्हॅन मधून बेहिशोबी पैसे नेले जात असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या भरारी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार आज दुपारी विरार पश्चिमेच्या भाजी मार्केट परिसरात सापळा लावून बॅंकेच्या एटीएम व्हॅनची चौकशी केली असता त्यात ही बेहिशोबी रक्कम आढळून आली आहे.
एटीएम व्हॅनसह अंदाजे दोन कोटी रक्कम ताब्यात घेऊन त्याची मोजणी सुरू आहे.