Wednesday, April 30, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

सुनील शेट्टी आजोबा तर अभिनेत्री अथिया शेट्टी, केएल राहुल होणार आई-बाबा!

सुनील शेट्टी आजोबा तर अभिनेत्री अथिया शेट्टी, केएल राहुल होणार आई-बाबा!

मुंबई : क्रिकेटर केएल राहुलची (KL Rahul) पत्नी आणि अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी, बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) हिने प्रेग्नेंट असल्याची गोड बातमी (good news) चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अथिया शेट्टीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गूड न्यूज दिल्याने चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे जानेवारी २०२३ मध्ये लग्न झाले. आता दीड वर्षाच्या सुखी संसारानंतर दोघेही पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

 
View this post on Instagram
 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

पोस्टद्वारे प्रेग्नेंसीची घोषणा

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलंय, "आमचे सुंदर आशीर्वाद लवकरच येत आहेत. २०२५". या फोटोमध्ये चिमुकल्या बाळाची पाऊलेही दिसत आहे. या पोस्टद्वारे या जोडप्याने प्रेग्नेंसीची घोषणा करत पुढील वर्षी त्यांच्या बाळाच्या आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहे. या घोषणेनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment