Tuesday, December 10, 2024
Homeमहत्वाची बातमीशरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले ; त्यावेळी त्यांना मराठा समाजाला...

शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले ; त्यावेळी त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटले नाही

खासदार नारायण राणे यांनी घेतला समाचार

कुडाळ : ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होऊन गेले, त्या काळामध्ये त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटले नाही; महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा विचार आला नाही,आता मात्र तो विचार येत आहे. गेल्या अडीच वर्षात महायुतीने केलेल्या कामांवर टीका केली जात आहे. पण या सरकारने लोककल्याणकारी व लोकहितवादी योजना आणल्या आहेत. त्या विरोधकांना सहन होत नसल्याचे सांगताना, खा. नारायण राणे यांनी यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.
घराणेशाहीचा आरोप करताना गांधी,पवार,ठाकरे या घराण्यांनी आपल्या घराणेशाहीबाबत बोलावे असा टोलाही त्यांनी पावशी येथील कुडाळ तालुका भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात लगावला.

…तर हिंदुत्वपणाला लावणाऱ्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनीच धडा शिकवला असता!

या मेळाव्यावेळी खा.नारायण राणे यांनी सांगितले की, युद्ध आणि निवडणूक सारखी आहे जोपर्यंत आपण विजयी होत नाही तोपर्यंत लढत राहिलो पाहिजे. सगळ्या प्रकारे आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल. पण शांततेत आणि आपल्या महायुतीने केलेली विकास कामे लोकांपर्यंत घेऊन जाऊन महायुतीला कसे मतदान होईल हे पाहिले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व पणाला लावले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असले असते तर हिंदुत्व पणाला लावणाऱ्या उद्धव ठाकरे याला गोळ्या घातल्या असत्या.उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत जो शिवसेनेचा कार्यकर्ता नावारुपाला आला त्याला संपवण्याचे काम केले. त्याच्याबद्दल बदनामी करणे, अपशब्द वापरणे आणि संघटनेतून घालून देणे हे फक्त पैशांसाठी आणि सत्तेसाठी त्यांनी केले. कोकणात एकही प्रकल्प त्यांनी आणला नाही. राजकारण अन प्रशासनातील अज्ञानी माणूस म्हणजे उद्धव ठाकरे आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे वयोवृद्ध झाले तरी ते तरुण होते त्यांच्या वाणीतून निखारे वाहत होते. त्यांनी कधीही सत्तेसाठी हिंदुत्व गहाण ठेवले नाही.असे टीकास्त्र खा.राणे डागले. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि खासदारकीला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मताधिक्य मिळवण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसावी असे कार्यकर्त्यांना आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -