मुंबई: जिओच्या आतापर्यंत अनेक रिचार्ज प्लानचा तुम्ही वापर केला असेल. आज आम्ही तुम्हाला अशा रिचार्जबद्दल सांगणार आहोत जो या कॅटेगरीमधील सर्वात स्वस्त प्लान आहे. येथे जिओचा ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त प्ला आहे. यात अनलिमिटेड कॉल, इंटरनेट डेटा, एसएमएस आणि बरंच काही फ्री मिळेल.
जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत ४७९ रूपये आहे आणि ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह हा प्लान येतो. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.
जिओच्या या सर्वात स्वस्त प्लानमध्ये युजर्सला एकूण ६ जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. दरम्यान हा डेटा अनेक लोकांना कमी वाटू शकतो. अनेक मोबाईल युजर्स असे असतात ज्यांना केवळ कॉलिंगचा प्लान हवा असतो. त्यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये इंटरनेट असते त्यामुळे त्यांना केवळ कॉलिंगची सुविधा हवी असते.
जिओच्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण १०० एसएमएस मिळतात. यात युजर्स आपल्या गरजेच्या हिशेबाने वापर करू शकतात.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.
लाेकं काय म्हणतात या पेक्षा तुम्ही किती देवु शकता या वर अवलंबुन आहे. जनते कडुन रिचार्जचा पैसा जेवढा घेता तेवढी सुविधा तरी देता काय ?
पैसा काय साेबत घेवुन जाणार आहात काय ?
जनतेचे बाेल घेण्या पेक्षा प्लॅनचे दर स्वस्त करा…….
आज दुर्दैवाने आमचे रतनजी टाटा आमच्या राहीले नाहीत. त्यामुळे बीएसएनएलचे स्वप्न बाकी राहीले.
या कमेंटवर विचार करा.