मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. यात तिने मल्टीकलरची साडी घालत पोझ दिल्या आहेत. जान्हवी कपूर ही तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या अदाकारीने अधिक ओळखली जाते. नुकतेच तिने आपले नवे फोटोशूट केले.
याचे फोटोज तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती साडीमध्ये दिसत आहे. जान्हवी कपूरने आपला पारंपारिक लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोत जान्हवी मल्टीकलर साडीमध्ये दिसत आहे. या साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
जान्हवीने या साडीसोबत लाईट मेकअप, मोकळे केस आणि मिलियन डॉलर स्माईलसह पूर्ण केला आहे. सोबतच अभिनेत्रीने गळ्यात एक चोकर नेकलेसही घातला आहे. यामुळे तिचा लूक राजेशाही वाटतो.
जान्हवी या फोटोत तिचा पदर हातात घेऊन हलवताना दिसत आहे. चाहत्यांचा तिचा हा लूक खूपच आवडला आहे. यावर तिने कॅप्शनही दिले आहे, कसाटा खाण्याची इच्छा झाली तर घातला.