मुंबई: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. या दरम्यान दोन्ही संघादरम्यान चार सामने खेळवले जाणार आहेत. आता या मालिकेची ट्रॉफी समोर आली आहे. दोन्ही कर्णधारांनी एकत्र फोटोशूट केले आहे.
टी-२० रँकिंगमध्ये भारत सध्या जगात नंबर १ टीम आहे. तर दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर आहे. एकीकडे भारतीय संघ टी-२० मालिका जिंकण्याची लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर आफ्रिकेचा संघ दीर्घ कालावधीनंतर एखादी टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
भारताच्या कामगिरीवर नजर टाकल्यास गेल्या ९ टी-२० मालिका भारतीय संघ हरलेला नाही. या ९ मालिकांमध्ये आठ वेळा भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. तर एक मालिका अनिर्णीत ठरली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला २०२२मध्ये आयर्लंडला २-० असे हरवल्यानंतर एकही टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेने एकूण ९ टी-२० मालिका खेळल्या आहेत. यात ७ वेळा त्यांना पराभव सहन करावा लागला. तर दोन मालिका अनिर्णिीत ठरल्या होत्या.
Trophy Unveiling ✅
Captains Photoshoot ✅#SAvIND | #TeamIndia | @surya_14kumar pic.twitter.com/9luB04GoLW
— BCCI (@BCCI) November 7, 2024
भारत वि दक्षिण आफ्रिका हेड टू हेड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ९ टी२० मालिका खेळवल्या गेल्या आहेत. यात चार वेळा टीम इंडियाला विजय मिळवता आला तर दोन वेळा आफ्रिकेने बाजी मारली. तीन वेळा मालिका बरोबरीत सुटली.