Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNarendra modi: आधीच्या सरकारनं महाराष्ट्राला लुटलं, नंतर जनतेला... मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Narendra modi: आधीच्या सरकारनं महाराष्ट्राला लुटलं, नंतर जनतेला… मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

धुळे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पहिली सभा झाली. अनेक दशकापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी होती. परंतु काँग्रेसने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा वर्षानुवर्ष सत्तेवर असलेल्या दिला नाही. काँग्रेसला आता धक्का बसला आहे. मोदी यांनी हे काम कसं केले, हा प्रश्न त्यांना पडला आहे. महाराष्ट्रमधील डबल इंजिन सरकार जोरदार काम करत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिली पसंत राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथे घेतलेल्या सभेत सांगितले.

मी महाराष्ट्रात वाढवण बंदराचे उद्घाटन नुकतेच केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मी त्यावेळी काही बोललो नाही. मात्र आता ज्या दिवशी महायुती सरकारचा शपथविधी होईल, त्यानंतर आम्ही राज्यसरकारसोबत बैठक घेऊ. त्या बैठकीत वाढवण बंदराजवळ नवीन विमानतळाचा निर्णय घेण्याबद्धल चर्चा होईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

महाविकास आघाडीकडे चालकच नाही…

महाविकास आघाडीच्या गाडीत चाक नाही, ब्रेक नाही. त्यांच्यात चालकांच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे होत आहेत. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने आधी सरकारला लुटलं. त्यानंतर विकास कामे थांबवली. त्यांनी मेट्रोची काम रोखून ठेवली. समृद्धी महामार्गाचे काम थांबवले. त्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विकासाची प्रत्येक योजना थांबवली. त्यानंतर राज्यात महायुतीची सरकार बनली. त्यानंतर अडीच वर्षांत विकास चौफर झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकास भरभरुन झाला आहे. आता महाराष्ट्रातील मतदारांनी लक्षात ठेवा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.

महिलांना जास्त अधिकार दिले

महायुतीने वचननामा जाहीर केला आहे. त्यांच्या दहा वचनांची चर्चा होत आहे. हा वचननामा जनतेच्या सूचनांमधून तयार झाला आहे. महायुतीचा वचननामा विकसित भारताचा आधार बनणार आहे. आमच्या बहिणींचे जीवन विकसित महाराष्ट्र, विकसित भारतासाठी चांगले बनवणे गरजेचे आहे. महिला पुढे जातील तर संपूर्ण समाज प्रगती करेल. त्यामुळे केंद्र सरकारने मागील १० वर्षांत महिलांना केंद्रात ठेऊन काम केले. आम्ही सर्व दरवाजे महिलांसाठी उघडले. त्यांना अधिकार दिले. महाराष्ट्रामधील महायुती सरकार केंद्राच्या पावलापाऊल ठेवून काम करत आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरु आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा देशभरात पाहायला मिळतेय. ही योजना काँग्रेस बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते कोर्टात पोहचले आहे. त्यांची सत्ता आली तर सर्वप्रथम ही योजना ते बंद करतील? असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -