मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बोचरी टीका
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षातील उमेदवारांच्या जंगीसभा होत आहेत. अशातच आज सोलापूर येथे परांडा विधानसभेचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी आहे, अशी बोचरी टीका केली.
दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊदे
बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी विकून टाकला असता. बाळासाहेब यांचे विचार विकायला निघाल्यावर आम्ही उठाव करण्याचे धाडस केले, त्यावेळी तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. आम्हीच शिवसेना वाचवली आहे. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण-बान-शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने केलेली काम बघून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊदेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.