Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजआघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक! चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच

आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक! चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेससह विरोधकांवर टीका

नाशिक/ धुळे : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत,ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रुप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मात्र,महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत,अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी केली.पंतप्रधान मोदी यांनी नाशिक आणि धुळ्यातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीरसभेत काँग्रेससह महाविकास आघाडीला लक्ष केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “ ”महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचे अडीच वर्षांचे शासन बघितले आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटले. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचे काम थांबवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध होण्याची गरज आहे.

“महायुती सरकारच्या केंद्रस्थानी महिला आहेत. कारण महिलांचा विकासा झाला, तरच समाजाचा विकास होता. त्यामुळे आम्ही महिलांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही लाडकी बहीण सारख्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. लाडकी बहीण योनजेची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही देशभरात सुरु आहे. मात्र, काँग्रेस आणि महाविकास आघाडी नेते ही योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांचे काही लोक न्यायालयातही जाऊन आले. त्यांना महिलांचा झालेला विकास पचणी पडत नाही”, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली.

“काँग्रेस जातीजातीत भेद निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वंचितांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू त्याला विरोध करत होते. अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण दिलं. त्यानंतर इंदिरा गांधींनीही एससी, एसटींना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी प्रयत्न केले. एससी, एसटी, ओबीसी हा समाज मजबूत झाला तर काँग्रेसच्या राजकारणाचं दुकान बंद होईल ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते त्यांच्या आरक्षणाला विरोध करतात”, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.

हम एक हैं तो सेफ हैं

‘हम एक हैं तो सेफ हैं’ असा मूलमंत्र देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथील विशाल प्रचार सभेत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विभाजनवादी राजकारणापासून सावध राहण्याचा इशारा दिला. ‘एक देश एक संविधान’ हीच माझी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठी आदरांजली आहे. महाराष्ट्र पुढे गेला तरच देश पुढे जाईल असे स्पष्ट करीत पंतप्रधान मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.

सशक्त भारतासाठी नाशिकची महत्वाची भूमिका

नाशिकला झालेल्या इन्फ्रा स्ट्रक्चरचा फायदा कुंभमेळ्यात होणार आहे. येथील आयटी पार्क तरुणांना रोजगार देणार आहे. संरक्षण विभागाच्या उपकरणांची नाशिकमध्ये निर्मिती होत आहे.नाशिक सशक्त भारतासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे. दुसरीकडे, विरोधी आघाडी देशाला कमजोर करत आहे. संरक्षण उत्पादनाबाबत त्यांनी विवाद उभे केले. कर्मचाऱ्यांना भडकवले. मात्र, तरीही एचएएल या लढाऊ विमान कारखान्याने उत्पादनाचा विक्रम केला. नियत चांगली असेल तर परिणाम चांगले होतात.

काँग्रेसने ओबीसींचे विभाजन केले

ओबीसी समाजाची एकता तोडा हेच काँग्रेसचे सर्वात मोठे शस्र आहे. आदिवासींमध्ये ते फूट पाडताहेत. नेहरू काळात ओबीसी विभाजन करण्यात आले. इंदिरा, राजीव काळातही तेच झाले. ओबीसींना त्यांनी एक होऊ दिले नाही. ९० च्या दशकात ओबीसी एक झाले. ते ताकदवान होताच स्वबळावर काँग्रेस सरकार होणे बंद झाले. ओबीसी कमजोर करा तरच सत्ता मिळेल हेच त्यांचे सूत्र आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजांची एका दमात नावे घेताच टाळ्यांचा कडकडाट झाला. काँग्रेस ओबीसींना आपसात लढवते आहे. काँग्रेस ओबीसींचा तिरस्कार करते. ओबीसी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला. ओबीसी कसा पंतप्रधान झाला? असे काँग्रेसला वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -