मुंबई: Vodafone-Ideaने आपल्या एका रिचार्ज प्लानची किंमत पुन्हा एकदा कमी केली आहे. खरंतर, वोडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआय कंपनी आपल्या युजर्ससाठी ७१९ रूपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान ऑफर करत होती. या रिचार्ज प्लानला कंपनीने जुलैमध्ये झालेल्या किंमत वाढीनंतर महाग केले होते.
खरंतर, जुलै महिन्यात जिओ आणि एअरटेलसह व्हीआयनही आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली होती. त्याच वेळेस कंपनीने आपला ७१९ रूपयांच्या प्लानमध्ये वाढ करून ८५९ रूपये केली होती. आता व्हीआयने हा प्लान पुन्हा ७१९ रूपयांच्या जुन्या किंमतीला लाँच केला आहे.
व्होडाफोन-आयडियाचा ७१९ रूपयांचा प्लान
या प्लानसोबत व्हीआयच्या युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधेसह दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. व्हीआयचा हा प्रीपेड रिचार्ज प्लान हा दीर्घ व्हॅलिडिटीसह येतो. यासाठी या प्लानसोबत युजर्सला ७२ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानसोबत युजर्सला कोणत्याही प्रकारच्या ओटीटी सबस्क्रिप्शन मिळत नाही. दरम्यान यात युजर्सला ७२ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच युजर्सला या प्लानसाठी दररोज ९.९८ रूपये म्हणजेच १० रूपये खर्च करावे लागतात.