Thursday, January 15, 2026

उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही - बावनकुळे

उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही - बावनकुळे

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) एक्सवरून हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबच आहे. उद्धवजी, नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो.

Comments
Add Comment