मुंबई: न्यायदेवता शनी देव महाराज लवकरच आपली राशी परिवर्तन करत आहे. शनीचे हे राशी परिवर्तन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. शनी सध्या आपली स्वत:ची रास कुंभमध्ये विराजमान आहेत. २९ जून २०२४ला शनी कुंभ राशीत वक्री झाले होते. १५ नोव्हेंबरपासून ते राशीमध्ये मार्गी होत आहेत. म्हणजेच ते चाल परिवर्तन करत आहे.
शनीदेवाला कलियुगातील न्यायाधीश म्हटले जाते. शनी देव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. १५ नोव्हेंबरला शनीच्या चालीमध्ये परिवर्तन झाल्याने अनेक राशींना लाभ होण्याची शक्यता आहे. तर अनेक राशींचे त्रास दूर होणार आहेत.
मेष रास
मेष राशींना इच्छित यश मिळेल. कामाच्या ठिकाणचे प्रॉब्लेम्स संपतील. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होती. तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. लव्ह पार्टनरसोबत सुखद अनुभव व्यतीत कराल.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांना शनी मार्गी झाल्याने लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या गती येईल. दीर्घकाळापासून थांबलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर यापासून सुटका होईल. मेहनतीचे फळ मिळेल.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांना शनी वक्रीवरून मार्गी झाल्याने शुभ परिणाम मिळतील. समस्यांचा अंत होईल. आत्मविश्वास वाढेल. कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. घर-कुटुंबात सुख-शांती राहील.