मुंबई: भारताला नुकताच मायदेशात न्यूझीलंडकडून ३-० असा व्हाईटवॉश सहन करावा लागला. त्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने याबाबत भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका ३-१ने जिंकेल असे. या मालिकेत भारताला केवळ एकच सामना जिंकता येईल. अशी भविष्यवाणी रिकी पाँटिंगने केली आहे. कारण मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत कसोटीत २० बळी घेणे भारतासाठी अवघड आव्हान असेल. याआधी सुनील गावस्कर यांनीही भारत ही मालिका ४-० अशी जिंकणे शक्य नसल्याचे म्हटले होते.
एका कार्यक्रमादरम्यान पाँटिंगने हे वक्तव्य केलं. तो म्हणाला, ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्यता अधिक आहे. शमी दुखापतीमुळे क्रिकेट खेळत नाही आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या जलद गोलंदाजांमध्ये उणीव जाणवते.
यावेळी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कौतुकही केले. पाँटिंग म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा संघ स्थिर आहे. २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होत असलेल्या मालिकेत भारत कमकुवत वाटत नाही. माझ्या मते भारत एक सामना जिंकेल.