मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा बिघाड झाल्यामुळे आज नवी मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला (Water Shortage) सामोरे जावे लागत आहे. काही भागा पाणीपुरवठा झाला नसला तरीही अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील मुख्य जलवाहिनी नेरुळ येथे लिकेज झाली आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे आज सायंकाळीही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच उद्या सकाळी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.