Sunday, October 19, 2025
Happy Diwali

Manisha Kayande : छ. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या वर्षा गायकवाड यांनी माफी मागावी -  डॉ. मनीषा कायंदे

Manisha Kayande : छ. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या वर्षा गायकवाड यांनी माफी मागावी -  डॉ. मनीषा कायंदे

मुंबई : महाविकास आघाडीच्या (MVA) एका कार्यक्रमात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikawad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला.

एक कार्यकर्ता छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन व्यासपीठावर भेट द्यायला येत होता. परंतु खा. वर्षा गायकवाड यांना स्वत:चा फोटो काढायचा होता म्हणून त्यांनी महाराजांची प्रतिमा स्वीकारली नाही आणि शरद पवारजी यांना दिली नाही. त्याठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, सतेज पाटील अन्य नेते होते. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. महाविकास आघाडीचे नेते यावर माफी मागणार की गप्प बसणार ?

छ. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मुजोर कॉंग्रेस खा. वर्षा गायकवाड जर महाराष्ट्रातल्या खासदार असतील तर त्यांनी या घटनेवर त्वरित माफी मागितली पाहिजे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >