मुंबई: हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमचा महत्त्वाचा रोल असतो. खाण्यापिण्यातून आपल्याला कॅल्शियम मिळते. अशातच आजपासून कॅल्शियम रिच डाएटला सुरूवात केली पाहिजे.
वय वाढल्यानंतर हाडे कमजोर होऊ लागतात. यामुळे याच्याशी संबंधित समस्या वाढतात. खासकरून ५० वर्षांनी हाडांच्या समस्या अधिक होतात. कारण वय वाढत जाते तसतसे हाडांतून कॅल्शियम कमी कमी होत जाते.अशातच म्हातारपणातही हाडे मजबूत ठेवणे आणि हेल्दी राखणे गरजेचे असते.
आज आम्ही तुम्हाला ५ पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे दररोज खाल्ल्याने हाडे मजबूत बनतील.
पनीर
पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असते. यामुळे हाडे मजबूत होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज ५० ग्रॅम पनीर खाल्ले पाहिजे. यातून अनेक पोषकतत्वे मिळतात.
नट्स आणि सीड्स
नट्स आणि सीड्समध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते. याशिवाय मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते.
हिरव्या भाज्या
कॅल्शियम आणि व्हिटामिन दोन्ही हाडांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर असते. यामुळे खाण्यामध्ये पालक, केल, ब्रोकोलीसारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
अंडी
अंडी पोषकतत्वांनी भरलेली असतात. यात व्हिटामिन डी आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. हे हाडांसाठी अतिशय गरजेचे असते. त्यामुळे नेहमी डाएटमध्ये याचा समावेश करा.
मासे
हाडांच्या मजबुतीसाठी मासेही गरजेचे आहेत. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटामिन डी आढळते.