Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीAalandi Kartiki Yatra : आळंदीत कार्तिकी यात्रेची लगबग सुरू!

Aalandi Kartiki Yatra : आळंदीत कार्तिकी यात्रेची लगबग सुरू!

विधानसभा निवडणुकीमुळे प्रशासनाचा वाढला ताण

पुणे : विधानसभा निवडणुकीत प्रशासन व्यस्त असताना कार्तिकी यात्रेमुळे प्रशासनावर दुहेरी ताण येणार आहे. निवडणुकीबरोबरच कार्तिकी यात्रेसाठी आळंदीत येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी स्थानिक प्रशासन, खेड तहसील, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, पोलिस आयुक्तालय व्यस्त झाले आहे. या यात्रेसाठी आठ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे.

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यात कार्तिकी वारी नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या वेळी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, वाहतुकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर, दिघी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विनायक पाटील, वारकरी महामंडळ उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे आदी उपस्थित होते.

भाविकांच्या सोयीसुविधांबाबत प्राधान्य

सदर बैठकीत पाणीपुरवठा, विद्युत, वाहतूक प्रश्न, पथ विक्रेत्यांची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण कारवाई, कायदा व सुव्यवस्था आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच विभागवार आढावा घेण्यात आला. पोलिस बंदोबस्त व पर्यायी मार्गांचा वापर, याबाबत नियोजन करण्यात आले. शहराच्या वेशीवर चारही बाजूंना पार्किंग व्यवस्था व वाहतूक वळविण्याबाबत चर्चा करण्यात आली. भाविकांच्या सोयीसुविधांबाबत प्राधान्याने उपाययोजना करण्याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या.

काय आहेत बैठकीतील मुद्दे?

  • आळंदीत २१ तारखेला पोलिस बंदोबस्त तैनात.
  • आळंदीत वाहनांना २१ नोव्हेंबरपासून प्रवेशबंदी.
  • पासधारक वाहनांना प्रवेश देण्यात येणार.
  • निवडणूक निकालानंतर आळंदीत मिरवणुकीवर बंदी.
  • इंद्रायणीला पाणी सोडण्यात येणार.
  • दर्शनबारी जागेचा प्रश्न तात्पुरता मार्गी.
  • देवस्थानकडून दिंड्यांना राहण्यासाठी जागा.
  • प्रदक्षिणा मार्गावर नो हॉकर्स झोन.
  • २४ तास आरोग्य सुविधा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -