Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्राला तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, सदाभाऊंची पवारांवर टीका

महाराष्ट्राला तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, सदाभाऊंची पवारांवर टीका

सांगली : शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा… महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, अशा शब्दात रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी, असंही ते म्हणाले.

जत विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर बोचरी व शारीरिक व्यंगावरुन टीका केली. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियाही उमटायला लागल्या आहेत.

हे अत्यंत चुकीचे व निंदनीय – अजित पवार

ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

क्षमता ओळखून शरद पवारांवर टीका करावी – अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले की, सदाभाऊ खोत यांनी आपली क्षमता ओळखून शरद पवारांवर टीका करावी. शरद पवारांवरील पातळी सोडून केलेली टीका आमचा पक्ष सहन करणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -