मुंबई: आयुर्वेदात कडिपत्त्याला औषधी मानले गेले आहे. खास बाब म्हणजे इतके सारे फायदे असतानाही कडिपत्ता खाण्याचा स्वाद वाढवतो. ज्या खाण्यामध्ये तुम्ही कडिपत्ता टाकता त्याचा स्वाद अनेक पटींनी वाढतो. दक्षिण भारतात तर कडिपत्त्याचा वापर भाजी, डाळ तसेच इतर पदार्थांमध्ये करतात.
रिकाम्या पोटी कडिपत्त्याचा रस पिण्याचे फायदे
कडीपत्ता केवळ खाल्ल्यानेच नव्हे तर याचा ज्यूस प्यायल्यानेही फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कडिपत्त्याचा ज्यूस पिऊ शकता. दररोज कडिपत्त्याचा ज्यूस प्यायल्याने लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळते. कडिपत्ता खाल्ल्याने अनेक आजारही दूर होतात. जाणून घ्या घरच्या घरी कडिपत्त्याचा ज्यूस कसा बनवाल.
कडिपत्त्यामध्ये अनेक व्हिटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट आढळतात. कडिपत्त्यामध्ये व्हिटामिन बी२, बी १ आणि व्हिटामिन ए असते. याशिवाय यात आर्यन, कॅल्शियम आणि प्रोटीनसारखे मिनरल्स आढळतात. कडिपत्त्यामध्ये अँटीडायबिटीक, अँटी मायक्रोबियल गुण असतात जे शरीराला आजारापासून रोखण्यास मदत करतात.
असा बनवा ज्यूस
एक वाटी स्वच्छ धुतलेली कडिपत्त्याची पाने घ्या. एका पॅनमध्ये २ ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा. जेव्हा हे पाणी उकळायला लागेल तेव्हा यात कडिपत्ता घाला आता हे पाणी चांगले उकळू द्या. जेव्हा हे पाणी निम्मे होईल तेव्हा गाळणीने गाळून घ्या. यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस घाला. तुम्ही हवे असल्यास केवळ कडिपत्त्याचा ज्यूस वाटूनही करू शकता. यासाठी कडिपत्ता मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटताना अर्धा कप पाणी मिसळा. गाळणीने ज्यूस गाळून घ्या. यात काळे मीठ आणि लिंबू टाकून प्या.