Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजUS Elections 2024 : अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार!

US Elections 2024 : अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार!

कमला हॅरिस यांना पराभूत करत डोनाल्ड ट्रम्प यांनी मिळवला दणदणीत विजय

वॉशिंग्टन : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत (US Elections 2024) रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) यांना पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे.

अटीतटीच्या लढतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच जोरदार मुसंडी मारत कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जानेवारी महिन्यात शपथ घेतील.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मतं मिळवणं आवश्यक असतं. दरम्यान आतापर्यंत ४८१ निकाल हाती आले असून, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना २६७ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. तर कमला हॅरिस यांना २१४ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे विस्कॉसिन, मिशिगन, अॅरिझोना, नेवाडा आणि अलास्का या राज्यांमध्ये आघाडीवर असल्याने ते तीनशेपार मजल मारतील, अशी शक्यता आहे.

याआधी २०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. मात्र त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. तसेच त्यांनी आक्रमक प्रचार करत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीही मिळवली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -