विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर
मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरू आहे. याबाबत आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगासह पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. अशातच पोलिसांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेकजण नेत्यांचे फोटो मॉर्फिग करून सोशल मीडियावर प्रसारित करतात. त्यांच्यावर त्यावेळी कारवाई होतेच, मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या गोष्टींवर सायबर पोलिसांचा कटाक्ष आहे. तसे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांसह कठोर शिक्षा होणार आहे.
काय होणार शिक्षा?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मेसेज, व्हिडिओ, फोटोंवर लक्ष ठेवण्यासाठी सोलापूर शहर सायबर पोलिसांनी एक हवालदार व चार अंमलदारांची टीम नेमली आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, शेअरचॅट अशा ठिकाणी कोणी मूळ फोटो किंवा व्हिडिओमध्ये जाणूनबुजून छेडछाड केलेला व्हिडिओ किंवा फोटो प्रसारित केल्यास पाच लाख रुपयांचा दंड व तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे ग्रुप ॲडमिनने अशा बाबींकडे आवर्जून लक्ष द्यावे, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.