निजामशाहीच्या पाठीराख्यांना नारायण राणेंचा इशारा
सिंधुदुर्ग : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होत आहे. मात्र, मनसे, वंचित, एमआयएम (MIM) आणि परिवर्तन शक्तीच्या माध्यमातून इतर नेतेमंडळीसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने उमेदवार दिला असून अकबरुद्दी ओवैसी यांनी नासिर सिद्दिकी यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. सिद्दिकी यांनी या प्रचारसभेत बोलताना नितेश राणेंवर हल्लाबोल केला. नितेश राणेंचं नाव न घेता त्यांना विधानसभेत घुसून मारू,अशा शब्दात त्यांनी धमकीचं दिली आहे. एक पाच फूट, ५ रुपयावाला पेप्सी मशिदीत घुसून मारू, अशी भाषा करतो, एवढी हिंमत वाढली आहे. पण मी तुम्हाला सांगतो विधानसभेत घुसून मारण्याची ताकद ठेवतो, असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता थेट केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) नासिर सिद्दिकी यांचयवर पलटवार केला आहे.
गेल्या काही दिवसांत नितेश राणे यांनी हिंदू जनजागरण रॅली व मुस्लिमांविरुद्ध प्रक्षोभष भाषण केल्यामुळे मुस्लीम समाजाचा रोष त्यांच्याबद्दल वाढला आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार नासिर सिद्दिकी यांनी त्याच भाषणांचा संदर्भ देत भाजप नेते नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. नितेश राणे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष विधानसभेत घुसून मारू, असं सिद्दिकी यांनी म्हटलंय. मंगळवारी छत्रपती संभाजीनगरच्या अमखास मैदानावर अकबर ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सभेत बोलतांना सिद्दीकी यांनी हे वक्तव्य केले. त्यावरुन, आता राजकीय वाद चांगलाच पेटला असून नासिर सिद्दिकी यांच्या वक्तव्यावर थेट माजी केंद्रीयमंत्री व खासदार नारायण राणेंनी पलटवार केला आहे. नारायण राणेंनी जशात तसे उत्तर देत नितेश राणे आणि हिंदूंविरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील, अशा थोडक्याच शब्दात इशारा दिला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा एमआयएम आणि भाजप नेत्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्यांवरुन जुंपली आहे.
एम्आयएमचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांनी आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी जाहीर भाषणातून केली. हा तोच पक्ष आहे, एक एक मुसलमान ज्याच्या प्रमुखांनी २० हिंदूंना भारी पडेल अशी दर्पोक्ती केली होती. निजामशाहीच्या या पाठिराख्यांनी लक्षात ठेवावे देशात आता लांगुलचालन करणाऱ्यांचे सरकार नसून बहुसंख्यांचे हितरक्षण करणारे सरकार आहे. नितेश राणे आणि हिंदू विरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील. अशी पोस्ट सोशल मीडियावर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
निजामशाहीच्या पाठीराख्यांना इशारा pic.twitter.com/1fWNOluzIz
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 6, 2024