Thursday, September 18, 2025

शरद पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही - अजित पवार

शरद पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही - अजित पवार

मुंबई : शरद पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत दिला आहे.

ज्येष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब यांच्याविषयी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे असे सांगतानाच अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवारसाहेबांवर वैयक्तिक टीका करणे पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने व वैयक्तिकरित्या या विधानाचा अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा