कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या १० वचनांची घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.
महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी, ड्रोन दिदी अशा योजना राबवल्या. डबल इंजिनचे सरकार आहे. आम्ही दिल्लीत जातो ते राज्यातील अनेक योजनांसाठी निधी आणण्यासाठी जातो. राज्याच्या विकासासाठी पैसे मागतो पण काहीजण दिल्लीत जातात मुख्यमंत्री करा, चेहरा बनवा यासाठी जातात मात्र महाविकास आघाडीला जो चेहरा नकोय ते महाराष्ट्राला कसा चालेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगावला.
देंवेंद्रजींनी सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना बंद केली त्याची चौकशी लावली. महाविकास आघाडीने मेट्रो बंद पाडली, अटल सेतूचे काम रोखले, कोस्टल रोडचे काम बंद केले. आम्ही सर्व प्रकल्प सुरु केले आणि पूर्ण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड सादर केले. त्यासाठी हिंमत लागते आणि काम कराव लागते, असे ते म्हणाले. अडीच वर्षात मविआने केवळ ४ सुप्रमा दिल्या होत्या, महायुतीने दोन वर्षात सिंचनाच्या १२४ सुप्रमा दिल्या आणि लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री सहायता निधीमधून दोन वर्षात ३५० कोटी वाटले आणि एक लाख नागरिकांचे प्राण वाचले, असे ते म्हणाले.
आधीच्या सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना मंदिर बंद होती, मंदिरे सुरु करण्यासाठी आंदोलनं करावी लागली, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. विकासाचे मारेकरी म्हणून महा आघाडीची इतिहासात नोंद होईल, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंचगंगेच्या महापूरावर कायमस्वरुपी योजना करण्यासाठी ३२०० कोटींची योजना सरकारने आणली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या २३ तारखेला छोट्या मोठ्या लवंग्या ऐवजी अँटम बॉम्ब फोडायचा आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…